

Sunetra Pawar
sakal
माळेगाव : राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बोलाविण्यात आलेली संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक आज अचानक तहकूब करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत माहिती देण्यात आली.