

Attempt to Murder Using Tractor in Malegaon Shivnagar
माळेगाव : माळेगाव- शिवनगर (ता. बारामती) येथे घरासमोरील सिमेंटच्या विटांचे कंपाउंड परवानगीशिवाय ट्रॅक्टरच्या धडका देऊन पाडल्याचा तसेच ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आज प्रकार घडला. यावेळी विरोध करणाऱ्या नरूटे कुटुंबीयांना दगड व हाताने मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.