माळेगाव - माळेगाव कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर आज मंगळवार (ता. २७) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणूक प्रक्रियेत एकूण ५९३ उमेदवारी अर्ज बारामती निवडणूक कार्यालयात प्राप्त झाले..विशेषतः या उमेदवारी यादीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'ब' वर्ग संस्था मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केल्याचे स्पष्ट झाले. पवार हे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनेलमध्ये सहभागी होतात का? हा खरा उत्सूकतेचा विषय झाला आहे. तसे झाल्यास पक्षाच्या पॅनेलला खूपच वजन प्राप्त होणार असल्याचे मानले जाते..माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणूकीच्या रिंगण्यात उतरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या श्रेष्टींनी आज आपले उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल केले. त्यामध्ये खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार ('ब' वर्ग मतदार संघ), बाळासाहेब तावरे (माळेगाव गट), केशवराव जगताप, राजेंद्र जगताप (पणदरे गट), अनिल तावरे, प्रकाश तावरे (सांगवी), सतिश तावरे (माळेगाव), रामदास आटोळे (खांडज गट), पोपटराव गावडे (बारामती) आदींचा समावेश आहे..बाळासाहेब तावरे (वय-८३) यांनी सुमारे २८ वर्षे कारखान्याच्या संचालकपदावर काम केले, तर अध्यक्षपदावर ते जवळपास १७ वर्षे कार्यरत राहील्याची नोंद आहे. केशवराव जगताप (वय-७८) हे दोन वर्षापासून अध्यक्षपदावर काम करीत आहेत, तर त्यांना संचालक पदाचा १७ वर्षांचा अनुभव आहे. राजेंद्र जगताप यांना माळेगाव कारखान्यात अधिकारी म्हणून ३६ वर्षे काम केल्याचा अनुभव आहे..त्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून जगताप हे तीन वर्षे कार्यरत राहिले. या राजकिय प्राप्त स्थितीचा विचार करता विरोधी गटाचे प्रमुख व उमेदवार चंद्रराव तावरे (वय-८५) हे ४५ वर्षांपासून (सन १९८०) माळेगाव कारखान्याच्या राजकारणाशी संलग्न आहेत. तसेच रजंन तावरे (वय-७२) हे जवळपास तीस वर्षांपासून कारखान्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचे स्पष्ट होते..दरम्यान, सहा गटातून शेवटच्या दिवशी मंगळवारी दोनशे, तर एकूण ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामध्ये माळेगाव गटातून आजवर ५१, पणदरे गटातून ७९, सांगवी गटातून ५४ , खांडज-शिरवली गटातून ६६, नीरावागज येथून ५९, बारामती गटातून ७९, महिला राखीव मतदार संघातून ६८, अनुसूचित जाती-जमाती मधून २०, भटक्या जातीमधून ६४, इतर मागास प्रवर्गातून २५ आणि ब वर्ग संस्था मतदार संघातून २८ उमेदवारी अर्ज आजवर दाखल झाल्याची नोंद आहे..पवारांच्या उमेदवारीने चर्चेला उधान...माळेगाव कारखाना निवडणूकीत 'ब' वर्ग मतदार संघातून खुद्द अजित पवार यांचीही उमेदवारी जाहीर झाल्याने चर्चेला उदान आले आहे. बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत..पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रेय येळे, तर अनुमोदक म्हणून सुनिल पवार यांच्या सह्या आहेत. श्री. येळे यांनीच पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने,गणेश शिंदे यांनी दिली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.