बारामती, ता. 25 : तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 24 तास उलटल्यानंतरही एकच फेरी संपली असून दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी देखील प्रदीर्घ काळ चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान पहिल्या फेरीमध्ये 21 उमेदवारांपैकी तब्बल 17 जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर असून चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार चार जागांवर आघाडीवर आहेत.