बारामती, ता. 24 : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिला निकाल जाहीर झाला असून ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांना 91 तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडले आहेत.