माळेगावात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

माळेगावात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

Published on

माळेगाव, ता. १ : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे विहिरीत पडून एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा आणि त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २८ फेब्रुवारी) सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास घडली.
महारुद्र शरद भुंजे (वय ७१), मोहन हनुमंत खोमणे (वय ३८) असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, माळेगाव बुद्रुक येथील शेतकरी महारुद्र भुंजे हे नेहमीप्रमाणे शेतातील विहिरीवर माशांना खाद्य टाकण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या काठावर उभे असताना त्यांचा तोल जाऊन ते थेट विहिरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच गावातील तरुण मदतीसाठी धावले. यावेळी माळेगाव खुर्द येथील मोहन खोमणे यांनी धाडसाने विहिरीत उडी टाकून भुंजे यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीची खोली व पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर पोलिसांसह ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रयत्नांनी बचावकार्य हाती घेतले होते. अमोल किसन परदेशी, हनुमंत रामचंद्र परदेशी, अमोल पोपट देवकाते आदी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शनिवारी रात्री उशिरा विहिरीतील पाण्याबाहेर काढण्यात यश आले. साहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास साळवे म्हणाले की, प्राथमिक तपासात हा अपघाती मृत्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद माळेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.'''' असे त्यांनी सांगितले. दरम्यान , मयत महारुद्र भुंजे यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते उद्योजक अतुल भुंजे यांचे वडील होत. तर मोहन खोमणे यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व तीन लहान मुली असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष असलेल्या मोहन यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे माळेगाव बुद्रुक व माळेगाव खुर्द या दोन्ही गावांवर रविवारी शोककळा पसरली होती.

3138, 3140

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com