सोमेश्वरनगर - माझं वय काढता? तुमच्या घरात तीन खासदार, दोन आमदार असताना आमच्या कारखान्याचे अध्यक्ष व्हायला निघालात? उद्या काटेवाडीच्या पोलिस पाटलाला जागा खाली करायला लावाल, अशी टीका माळेगावचे माजी अध्यक्ष चंदरराव तावरे यांनी केली.
तसेच, उद्या येणाऱ्या लक्ष्मीला नमस्कार करा. मात्र आपल्या वाडवडिलांनी काढलेला कारखाना आपल्याला जतन करायचाय. वाढवायचाय. खासगीकरणाच्या संकटातून तो वाचविला नाही तर पुन्हा निवडणूक होणार नाही. छत्रपतीचे झाले ते आपले होईल, असे आवाहन केले.