
पुणे : MPSC परीक्षेदरम्यान गैरप्रकार; फोन, ब्लूट्युथचा वापर केल्यानं खळबळ!
पुणे : शासकीय परीक्षांदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकारे दक्षता घेतली जाते. उमेदवारांनी अशा परीक्षांमध्ये कॉपी करणं हा गंभीर प्रकार मानला जात असून अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. पण तरी देखील अशा प्रकारचं गुन्हेगारी कृत्य करण्यास काहीजण धजावतात. असाच एक प्रकार पुण्यात MPSC परीक्षेदरम्यान घडल्याचं समोर आलं आहे. एका उमेदवाराकडं फोन आणि ब्ल्यूटूथ हेडसेट सापडल्यानं खळबळ उडाली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. (Malpractice during MPSC exam in Pune candidate catched raid hand for using phone bluetooth)
एमपीएससीनं याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये म्हटलं की, "महाराष्ट्र गट 'क' सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 ची परीक्षा आज पार पडली. दरम्यान, परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. यामध्ये पुणे जिल्ह्याच्या नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. या उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे"
Web Title: Malpractice During Mpsc Exam In Pune Candidate Catched Raid Hand For Using Phone Bluetooth
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..