माळशिरस येथे स्वच्छता अभियान

माळशिरस येथे स्वच्छता अभियान

Published on

MLS26B02604
माळशिरस : शहरातील स्वच्छता अभियानात सहभागी श्री सदस्य.
.............
स्वच्छता अभियानातून २ टन कचऱ्याचे संकलन
माळशिरास तालुक्यातील ५१४ श्री सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग
..........
माळशिरस, ता. १ : तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. अकलूज, बोरगाव, वेळापूर, पिलीव, चाकोरे, महाळुंग व मलोळी या गावांतील एकूण ५१४ श्री सदस्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. यामधून सुमारे २ टन कचरा गोळा करून तो माळशिरस नगरपंचायतीच्या अधिकृत कचरा डेपोमध्ये पाठविण्यात आला आहे.
रविवारी सकाळी आठ वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. शहरातील विविध १५ ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने साफसफाई करण्यात आली. या उपक्रमासाठी ११ ट्रॅक्टर व ५ घंटागाड्यांची मदत घेण्यात आली. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्वच्छता मोहिमेतून समाजात स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती निर्माण करण्यात आली आहे. येथील यशस्वी अभियानामुळे शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनण्यास निश्चितच हातभार लागला आहे.


स्वच्छता मोहिमेतून व्यापक संदेश
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, करकंब, कुरुल, मरवडे, मंगळवेढा, कडलास, टेंभुर्णी आदी ठिकाणी तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राज्यभर एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे स्वच्छतेचा व्यापक संदेश समाजात पोहोचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com