

लोगो : माळशिरस तालुका
मतदानात शिक्षकांची पदवीधरांवर आघाडी
शिक्षकांसाठी ९२.१२, तर पदवीधरांसाठी ७४.३३ टक्के मतदान
सकाळ वृत्तसेवा
नातेपुते, ता. २३ : माळशिरस तालुक्यात पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक मतदारांनी मतदानात आघाडी घेतली. शिक्षक मतदारसंघासाठी ९२.१२ टक्के, तर पदवीधर मतदारसंघासाठी ७४.३३ टक्के मतदान झाले. तालुक्यातील १९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
तालुक्यात शिक्षक मतदारसंघासाठी १,२६९ मतदारांपैकी १,१६९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघासाठी ६,५१७ मतदारांपैकी ४,८४४ जणांनी मतदान केले. मतदान प्रक्रियेसाठी ११४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अकलूज, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, दहिगाव आणि पिलीव या सहा गावांमध्ये पदवीधरांसाठी १३, तर शिक्षकांसाठी सहा मतदान केंद्रे होती.
भाजपकडून नियोजनबद्ध यंत्रणा
‘गोकुळ’च्या निकालानंतर भाजपने या निवडणुकीसाठी अधिक सतर्कतेने नियोजन केल्याचे चित्र माळशिरस तालुक्यात दिसले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार राम सातपुते यांनी तालुक्यातील प्रचाराची सूत्रे हाती घेतली होती. प्रत्येक २५ मतदारांमागे दोन कार्यकर्त्यांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीकडूनही जोरदार प्रयत्न
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनेही प्रचाराचे नियोजन केले होते. शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव-देशमुख यांच्यासाठी खासदार मोहिते-पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर तसेच हर्षदा देशमुख यांचे आई-वडील प्रचारात सक्रिय होते. प्रभाकर देशमुख यांनी पंढरपूर विभागात अनेक वर्षे प्रांताधिकारी म्हणून काम केले असल्याने त्यांचा जनसंपर्क आणि मोहिते-पाटील कुटुंबाशी असलेले सलोख्याचे संबंध यांचा फायदा होईल, अशी आघाडीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.