मलठण केंद्रावर ४२९ विद्यार्थी देणार परीक्षा
कवठे येमाई, ता. २० : मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूल परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला आज उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. या केंद्रावर परिसरातील पाच शाळांमधील एकूण ४२९ विद्यार्थी परीक्षेस बसल्याची माहिती केंद्र संचालक जयश्री अस्वले व सहाय्यक केंद्र संचालक कृष्णा नरोटे यांनी दिली.
या केंद्रावर निमगाव भोगी येथील हनुमान माध्यमिक विद्यालय, गणेगाव खालसा येथील रसिक भाऊ धारीवाल विद्यालय, वाघाळे येथील कालिकामाता विद्यालय, कवठे येमाई व मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या पहिल्या दिवशी ग्रामस्थ व केंद्र प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान, टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलिस अंमलदार अरूण उबाळे व शंकर बल्लाळ यांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन सुरक्षेची पाहणी केली. परीक्षा कालावधीतील गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे पथक प्रमुख दिपक गोटे व कर्मचारी उपस्थित होते. केंद्रावर शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने परीक्षा पार पडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

