माळवा-बुंदेलखंड बाजीरावांचे ऋण विसरणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री

"माळवा-बुंदेलखंड बाजीरावांचे ऋण विसरणार नाही"

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत महाराज छत्रसाल बुंदेले यांनी मुघलांशी संघर्ष करत राज्य स्थापन केले. ते स्वराज्य मुघल सेनापती मोहंमद खान बंगशाने जिंकले. तेंव्हा छत्रसालांच्या विनंतीहून बाजीरावांनी मराठे, रजपूत, जाट आणि बुंदेले यांची एकजूट करत, मुघलांच्या तावडीतून राज्य मुक्त केले. त्यामुळे माळवा-बुंदेलखंडची जनता बाजीरावांचे ऋण कधीही विसरणार नाही, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: साईड दिली नाही या कारणावरून गोळीबार करून केला प्राणघातक हल्ला

माळव्यातील रावेरखेडीमध्ये श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधीस्थळावर ३२१ वा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. मध्यप्रदेश सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने पेशवे समाधी आणि जिर्णोद्धार प्रकल्पाचे भूमीपूजन झाले. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर, कृषी मंत्री कमल पटेल, ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, खासदार गजेंद्र चौहान, होळकर घराण्याचे वंशज यशवंतराव होळकर, बाजीराव मस्तानीचे वंशज अवेश बहाद्दुर, बाजीराव स्मारक समितीचे सचिव श्रीपाद कुलकर्णी, श्रीनिवास कुलकर्णी आदी उपस्थित होते.

बाजीरावांनी अठरापगड जातीतील कर्तृत्ववान तरुणांना सोबत घेऊन, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य साम्राज्य केले. त्यामुळेच शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणे उदयाला आली, असे सिंधीया यांनी सांगितले. तर बलकवडे म्हणाले,‘‘सह्याद्रीतील गणिमीकावा माळवा-बुंदेलखंडाच्या मैदानी प्रदेशात सोईचा नाही. म्हणून बाजीरावाने घोडदळाचा गणिमीकावा विकसित केला. बाजीरावांनी माळवा बुंदेलखंडात साम्राज्य वाढविले आणि मराठी साम्राज्याचा पाया रचला.’’

हेही वाचा: साईड दिली नाही या कारणावरून गोळीबार करून केला प्राणघातक हल्ला

१०० कोटींचा विकासप्रकल्प ः

मध्यप्रदेश सरकारने थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी १०० कोटी रुपयांची व्यापक योजना आखली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे उद्घाटन चौहान यांच्या हस्ते झाले. बाजीरावांचा भव्य पुतळा, शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजाची प्रतिकृती, शिवमंदीराचा जिर्णोद्धार, संग्रहालय, पर्यटक निवास आदी साकारण्यात येणार आहे.

Web Title: Malwa Bundelkhand Will Not Forget Bajiraos Memories Mp Cm

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Memories