

मलवडीतील मारहाणीचा
परिचर कर्मचाऱ्यांकडून निषेध
सातारा, ता. २२ : मलवडी (ता. माण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना झालेली मारहाणीची घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेने आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांची भेट घेऊन या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी रामचंद्र सपकाळ, महेश गुरव, विनोद ननावरे, संजय जाधव, शशिकांत चव्हाण, अब्दुल मुल्ला, संजय बर्गे, अजित पवार, सुमीत पिसाळ, प्रकाश मोरे, राजश्री चिखले, वसावे, वनिता साबळे, सनी लोहरा आदी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. आगामी काळात अशा घटना कदापिही खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा राजू भोसले यांनी दिला.
.........
PNE26W29144
सातारा : राजू भोसले यांना निवेदन देताना रामचंद्र सपकाळ, महेश गुरव, विनोद ननावरे, संजय जाधव, शशिकांत चव्हाण, अब्दुल मुल्ला, संजय बर्गे, अजित पवार व इतर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.