रेल्वेचे आरक्षित तिकीट देतो सांगून मजुरांची फसवणूक करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

आरोपी दिनेश ब्रिजराज सिंग (35 रा. पुणे स्टेशनसमोर) याने जस्ट डायल वर लॉकडाउन काळात रेल्वे बाबत चौकशी करणाऱ्या काही अशिक्षित मजुरांचा गैरफायदा घेऊन त्यांना आरक्षित तिकीट मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांना स्टेशन परिसरात बोलावून घेतले होते. त्यांच्याकडून प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये घेऊन त्यांना स्टेशन बाहेर रंगेत उभे करून तिकीट न देता पळून जात होता.

पुणे : पश्‍चिम बंगालमध्ये आपल्या जावी जाण्यासाठी आरक्षीत तिकीट देण्याचे आमिष दाखवून मजुरांकडून पैसे घेणाऱ्यास गुन्हे शाखा दोनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, पश्‍चिम बंगालचे काही मजुर पुणे-हावडा (प.बंगाल) या श्रमिक एक्‍सप्रेसने मूळगावी जाणार होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरोपी दिनेश ब्रिजराज सिंग (35 रा. पुणे स्टेशनसमोर) याने जस्ट डायल वर लॉकडाउन काळात रेल्वे बाबत चौकशी करणाऱ्या काही अशिक्षित मजुरांचा गैरफायदा घेऊन त्यांना आरक्षित तिकीट मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांना स्टेशन परिसरात बोलावून घेतले होते. त्यांच्याकडून प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये घेऊन त्यांना स्टेशन बाहेर रंगेत उभे करून तिकीट न देता पळून जात होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आरोपी मजुरांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची बातमी युनिट-2 चे पोलिस कर्मचारी मोहसीन शेख याना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव आणि  कर्मचारी मोहसीन शेख, गोपाळ मदने, कादिर शेख या पथकाने सिंग यास रेल्वे स्टेशन समोरून ताब्यात घेतले. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी त्याला बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man arrested for defrauding workers of train tickets In pune