crime
Esakal
पुणे - पुणे महापालिकेत कार्यरत असणाऱ्या एका उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून, तुमचे मिळकतकर विभागात अडलेले काम करून देतो अशी बतावणी करून तब्बल सहा लाख रुपये उकळणाऱ्याला महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्यास अटक झाली. विजेंद्र पवार असे या संशयिताचे नाव असून, तो एका माजी जिल्हाधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे तपासात समोर आले आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी संतोष नाईक यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.