Man Arrested for Trafficking Monitor Lizard Body Parts
sakal
पुणे - पुणे रेल्वे स्थानक परिसरात वन्यजीवांची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पुणे वनविभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ‘हत्ता जोडी’ (घोरपडीचे सुकवलेले गुप्तांत) जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी मल्हार लाला लोखंडे याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.