esakal | परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Cigarette

चौधरी याने मोठ्या प्रमाणावर परदेशी बनावटीच्या सिगारेटचा साठा केल्याची आणि त्याची विक्री करणार असल्याची खबर खंडणी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

परदेशी बनावटीच्या सिगारेट विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लाखांचा मुद्देमाल जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : परदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून साडे सात लाख रुपये किंमतीचे परदेशी सिगारेट जप्त करण्यात आले. वडगाव शेरी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बनाराम गोमाजी चौधरी (वय ३५, रा. वडगाव शेरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चौधरी याने मोठ्या प्रमाणावर परदेशी बनावटीच्या सिगारेटचा साठा केल्याची आणि त्याची विक्री करणार असल्याची खबर खंडणी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकून सात लाख ६५ हजार रुपयांच्या परदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त केल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पांडुरंग वांजळे, प्रमोद टिळेकर, सैय्यद साहील शेख, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top