पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून मॅसेज करून मित्राला मारहाण करणाऱ्यास अटक

रवींद्र जगधने
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पिंपरी (पुणे) : स्वतःच्या पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून जाणूनबुजून मेसेज करून तरूणाला बोलावून घेत त्याच्यावर चाकूने वार करून मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता. २१) रात्री दीडच्या सुमारास रहाटणीतील बळीराज कॉलनीत घडली. 

सुनील राजू जाधव (वय १९, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गिरजेश दशरथ यादव (वय २७, रहाटणी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील व गिरजेश एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गिरजेश याने त्याच्या पत्नीच्या फेसबुक अकाउंटवरून सुनील याच्या फेसबुक अकाउंटवर ‘‘मी तुला ओळखते, तु पिंपळे सौदागरमध्ये राहतो. तु मला सहा महिन्यांपूर्वी फेटला होतास, मी घरी एकटी आहे, तु बळीराज कॉलनीजवळ ये.’’ असा जाणूनबुजून मॅसेज पाठवला. त्यानंतर सुनील बळीराज कॉलनीजवळ आला असता, ''तु माझ्या पत्नीला कशाला मॅसेज पाठवतो.'' असे म्हणून चिडून जाऊन गिरजेश याने सुनीलवर चाकुने वार करत मारहाण करून गंभीर जखमी केले.

Web Title: The man arrested by the wife's Facebook account and arrested the friend

टॅग्स