
पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचा गांजासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. शैलेश शंकर सूर्यवंशी (वय ३५, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.