
शिरूर : शहरापासून जवळच रामलिंग रस्ता परिसरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला शिरूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली. पिस्तूलाच्या धाकाने दहशतीचा शिरूर मधील प्रकार या कारवाईने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.