४९ वर्षांच्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवत घातला लाखोंचा गंडा; काय आहे हे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

पॉलने फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून फिर्यादीस बियाणे विक्रीच्या व्यवसायामधून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. त्यामुळे त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितले.

पुणे : लग्न जुळविणाऱ्या वेबसाईटद्वारे संगणक अभियंता महिलेशी ओळख वाढवून अनोळखी व्यक्तीने संबंधीत महिलेला तब्बल 49 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

- बंद म्हणजे बंद; पुण्यातील 'ही' मंदिरे 30 जूनपर्यंत राहणार बंद!

महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला व्यवसायात पैसे गुंतविण्यास भाग पाडून तिची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धानोरी येथे राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी डेनिस पॉल नावाच्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- पुणे पोलिसांचा 'तो' उपक्रम भविष्यातही सुरू ठेवा; गृहमंत्र्यांनी केल्या सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या पुण्यातील एका नामांकीत आयटी कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून काम करतात. त्या अविवाहीत आहे. त्यांना विवाह करायचा असल्याने त्यांनी लग्न जुळविणाऱ्या वेगवेगळ्या वेबसाईटवर त्यांची वैयक्तीक माहिती देऊन नोंदणी केली होती. दरम्यान, मागील वर्षी मार्च महिन्यात डेनिस पॉल नावाच्या व्यक्तीने फिर्यादीशी संपर्क साधला. तो अमेरीकेत वास्तव्य करत असून व्यावसाकि असल्याचे त्याने फिर्यादीस सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीशी ओळख वाढवून फिर्यादीला लग्नाची मागणी घातली. 

- माजी आमदार मेधा कुलकर्णी धक्काबुक्की प्रकरणी तिघांना अटक; आणखी एकजण फरार!

दरम्यान, पॉलने फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून फिर्यादीस बियाणे विक्रीच्या व्यवसायामधून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. त्यामुळे त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितले. फिर्यादीने त्याच्यावर विश्‍वास ठेवून वेळोवेळी 49 लाख 15 हजार 400 रुपये भरले. त्यानंतर फिर्यादीने त्याच्याशी संपर्क साधण्यास सुरूवात केली. मात्र संपर्क झाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A man cheated a woman of Rs 49 lakh by showing her the lure of marriage