

After Domestic Dispute, Man Jumps Into IAF Restricted Area at Pune Airport
esakal
पुणे : पत्नीशी झालेल्या तीव्र वादानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात एका २५ वर्षीय युवकाने भारतीय हवाई दलाच्या लोहेगाव विमानतळाच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला. भिंतीवरून उडी मारल्यानंतर त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि सुरक्षा दलांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. ही धक्कादायक घटना २२ जानेवारी रोजी दुपारी घडली असून, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.