
दौंड : बेरोजगार असतानाही एका तरुणाने लग्नाच्या वेळी बायको व कुटुंबीयांना पोलिस दलात भरती झाल्याची थाप मारली होती. परंतु वर्षभरानंतरही तो कुठल्याच पोलिस दलात हजर न झाल्याने कुटुंबीयांनी त्याच्याकडे तगादा लावला होता. त्यांचे खोटे समाधान करण्यासाठी त्या तरुणाने थेट राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.