
पुणे : मेव्हणीबरोबर बोलू नको,असे सांगितल्याचा राग आल्याने एकाने लाकडी बांबुने मारहाण करून संबंधित व्यक्तीचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास मांगडेवाडी येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही केली आहे.