esakal | घनदाट जंगलासाठी मानवनिर्मित ‘देवराई’
sakal

बोलून बातमी शोधा

Forest

घनदाट जंगलासाठी मानवनिर्मित ‘देवराई’

sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

पुणे - गावात आता कोणालाही देवराई (Devrai) करणे शक्य होणार आहे. कारण अवघ्या एक एकर जागेत मानवनिर्मित (Man Made) देवराई करता येणार आहे. यामध्ये ११९ प्रजातीची सुमारे ५१५ देशी लहान मोठी झाडे, वेली, झुडूपे लावल्याने त्यांची योग्य वाढ होते. अशा मानव निर्मित देवराईमुळे झाडांच्या माहितीचे ग्रंथालय, बियांचे संचय (बँक), बियांचे प्रसरण होऊन पूर्वीप्रमाणे अनेक जंगल निर्माण होण्यास मदत होणार आहे. गावपातळीवर ज्यांना देवराई करायचे असल्यास त्यांना मोफत रोपे व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती देवराई फाउंडेशनचे रघुनाथ ढोले यांनी सांगितले. (Man Made Deorai for Dense Forest)

ढोले म्हणाले, ‘देवराईत झाडाची लायब्ररी (ग्रंथालय) तयार होते. जशी पुस्तके वेगवेगळया खणात ठेवली जातात. त्याचा एक नकाशा असतो. झाडांचे सुद्धा प्रत्येक ग्रीडला क्रमांक नुसार रोपांची रचना व लागवड केल्यामुळे झाडे वाचता येतात. त्याचे खोड, पान, फुल, फळ ते पाहून वाचू शकतो. आता झाडे कागदावर न वाचता प्रत्यक्षात वाचली गेली तर त्या झाडाविषयी आत्मीयता निर्माण होईल. वृक्ष लागवडीच्या संवर्धनाला चालना मिळेल. या देवराईत आपल्याला लाखो बिया मिळतील.

हेही वाचा: शालेय पोषण आहार होणार बंद?

हवेमार्फत, पक्षांमार्फत, मधमाशा, फुलपाखरांमार्फत लाखो बियांचे प्रसरण होऊ अनेक बिया रूजून पूर्वीसारखी जंगल निर्माण होण्यास मदत होईल. देवराईत सकारात्मक ऊर्जा (पॉझिटिव्ह अेनर्जी) ७५० असल्यामुळे(इतरत्र) ठिकाणी साधाणत: ३५० असते. त्यामुळे देवराईत ध्यान करू शकतो.वाढदिवस साजरे करणे, बारसे करणे, गाव बैठक घेणे इत्यादी प्रकारे उपयोग होऊ शकतो.

- रघुनाथ ढोले, देवराई फाउंडेशन

गावपातळीवरील देवराईसाठी संपर्क साधा

कृषी पर्यटनासाठी देवराई अभिनव उपक्रम होऊ शकते. देवराई एक प्रकारची ऑक्सिजन बँक होऊ शकते. अनेक सजीवांना आश्रय स्थान मिळेल, कायमस्वरूपी अन्न-पाण्याची सोय होऊ शकते. मातीची धूप थांबते. हवेतील प्रदूषित धुलीकण रोखण्यास मदत होते. अशी ही मानव निर्मित देवराई ही काळाची गरज असून वृक्ष लागवडीस एक प्रकारची दिशादर्शक देवराई आहे. ज्यांना कोणाला वैयक्तिक अथवा गावपातळीवर देवराई उभारायची असेल त्यांना रोप लागवडी आराखडा (plan) व रोपे विनामूल्य दिली जातील यासह संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार असून, मो. क्रमांक ९८२२२४५६४५ , (Rmdholegmail.com) वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

loading image