esakal | 71 वर्षीय वृद्धेची हत्या करून बलात्कार, चाकणमध्ये घृणास्पद प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धेची हत्या करून बलात्कार, चाकणमध्ये घृणास्पद प्रकार

वृद्धेची हत्या करून बलात्कार, चाकणमध्ये घृणास्पद प्रकार

sakal_logo
By
नामदेव कुंभार

71 वर्षीय वयोवृद्ध महिलेची हत्या (Murder news) करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार पुण्यातील चाकण येथे घडला आहे. सखुबाई बबन राऊत असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या वृद्ध महिलेनं शरीर संबंधास नकार दिल्याने आरोपीनं तिचा खून केला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले आहे. अनिल सुदाम वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चाकण पोलिसांनी (chakan police) अवघ्या चार ते पाच तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीनं चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. (Man nabbed for rape-murder of 71-yr-old Chakan woman)

सखुबाई यांचा खून झाल्याची तक्रार विमल शिवाजीराव राऊत यांनी चाकण पोलिसांत केली. सखुबाई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल वाघमारे याने वयोवृध्द सखूबाई यांच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मृत सखुबाई यांनी त्यावेळी प्रतिकार केला. रागाच्या भरात आरोपीनं तिच्या डोक्यात घरात असलेल्या चुलीसमोरील लोखंडी फुकणीने मारहाण केली. या मारहाणीमध्ये सखुबाई हिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: ब्लाऊजनं गळा आवळून सासूचा खून, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

सखुबाईचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीनं वाघमारे मृत शरीरासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी वाघमारे याला अटक केली. सखुबाई यांची हत्या कोणी? का? आणि कशाने केली? हे सुरुवातीला पोलिसांना समजत नव्हते. मात्र पोलिसांनी संपुर्ण गाव पिंजून काढले, अन् आरोपीला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याच्या तपासात पुण्यातील श्वान पथकातील ‘जॅक’ श्वानाची मोलाची मदत झाली.