Threat To Blow Up Pune Railway Station With Bomb : काही तासांपूर्वीच पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन पोलिसांना होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता पुणे शहर पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दारूच्या नशेत त्यानं फोन केल्याची माहिती समोर आली आहे.