वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या धनगरवाडी येथील सह्याद्री लॉजच्या व्यवस्थापकास अटक

वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या धनगरवाडी येथील सह्याद्री लॉजच्या व्यवस्थापकास अटक

नारायणगाव : धनगरवाडी (ता. जुन्नर) येथील सह्याद्री लॉजवर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉज व्यवस्थापकाला अटक केली असून, एका सव्वीस वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली असून महिलेची रवानगी पुणे येथील निवारा केंद्रात केली आहे.अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी.के.गुंड यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणी  नारायणगांव पोलिसांनी सह्याद्री लॉजचे व्यवस्थापक प्रवीण राम जाधव (वय ३२, राहणार नारायणगाव) याला अटक केली आहे. या बाबत गुंड म्हणाले धनगरवाडी (ता.जुन्नर) येथील कारखाना फाटा येथे असलेल्या सह्याद्री लॉजवर वेश्या व्यवसाय  सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा तयार करण्यात आला. त्या नुसार पोलिस स्टाफ, पंच व बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. या वेळी व्यवस्थापक जाधव याने बनावट ग्राहकाकडून एक हजार रूपये घेऊन सव्वीस वार्षीय महिलेला ताब्यात दिले. ही कारवाई साहय्यक पोलिस निरीक्षक गुंड, पोलिस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के व नारायणगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com