

Manchar Ambegaon customer receives Rs 3.97 lakh insurance claim after gold chain theft through Kulswami Jewellers free jewellery insurance
Sakal
मंचर : सोन्याचेदागिन्यांच्या खरेदीसोबत दिल्या जाणाऱ्या मोफत विमा सुविधेचा ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळू शकतो, याचे उदाहरण मंचर येथील कुलस्वामी ज्वेलर्सने पुन्हा एकदा समोर आणले आहे. कुलस्वामी ज्वेलर्सचे ग्राहक राहुल लाड यांच्या अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या साखळीची चोरी झाल्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून सुमारे ३ लाख ९७ हजार १०० रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला. यानिमित्त कुलस्वामी ज्वेलर्सचे संचालक अमोल लोळगे यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्योजक अजय घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.