

Infrastructure Boost: ₹5.36 Crore Sanctioned for Manchar Bus Stand Renovation
Sakal
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या मुख्य ठिकाणी असलेल्या मंचर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ५ कोटी ३६ लाख २९ हजार ५५९ रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने नुकतेच आदेश निर्गमित करण्यात आले.