

High Risk Canal Interception: Suspect Pushes 20-Year-Old Woman into Dimbhe Aqueduct
Sakal
मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मंचर बाह्य वळणाजवळ रविवारी (ता. १४) सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत एका तरुणाने तरुणीला हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) उजव्या कालव्यात ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित तरुणानेही कालव्यात उडी घेतली. स्थानिक तरुणांनी धाडस दाखवत पाण्यातून बाहेर काढले, मात्र स्वप्नाली पोपट भांगरे (वय २०, सध्या रा. मंचर, मूळ रा. कोतूळ, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) ही तरुणी रात्री उशिरापर्यंत बेपत्ता होती.