

Manchar Development Plan Revision: Protest Suspended After Written Assurance
esakal
मंचर : मंचर नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यातील प्रस्तावित आरक्षणांबाबत दुरुस्ती करावी, या मागणीसाठी मंगळवार (ता. १७) पासून सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाची शुक्रवारी (ता. २०) सांगता झाली. मंचर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी किरण मार्कंड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाही करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे उपस्थित होते