मंचर उपजिल्हा रुग्णालयात 
दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी शिबिर

मंचर उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रांसाठी शिबिर

Published on

मंचर, ता. १६ : येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रलंबित दिव्यांग (अपंग) प्रमाणपत्रांच्या निपटाऱ्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. १६) ते शुक्रवार (ता. २०) या कालावधीत, गुरुवारची गुढीपाडवा सुट्टी वगळता चार दिवस हे शिबिर होणार असल्याची माहिती नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. राहुल जोशी यांनी दिली.
या शिबिरात दृष्टिदोष व अस्थिव्यंग या दोन प्रकारच्या अपंगत्वांची प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. ज्या दिव्यांग व्यक्तींनी अर्ज भरले आहेत, त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपले प्रमाणपत्र त्वरित मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय दर शुक्रवारी नियमित शिबिरही सुरूच राहणार आहे.
दरम्यान, मंचर उपजिल्हा रुग्णालयात दर आठवड्याला मंगळवारी नेत्र तपासणी करण्यात येते, तर बुधवारीसंबंधित रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णांसाठी नाश्ता व भोजनाचीही विनामूल्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com