Manchar News : मंचर नगरपंचायतीतील ठेकेदारांच्या बिलांचा प्रश्न ऐरणीवर; टक्केवारीच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची उपनगराध्यक्षांची मागणी

Percentage Demanded for Contractor Bills at Manchar Nagar Panchayat, Deputy President Alleges : मंचर नगरपंचायतीमध्ये ठेकेदारांची बिले काढण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याचा आरोप उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी केला. मुख्याधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त करत त्यांनी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
esakal

esakal

Percentage Demanded for Contractor Bills at Manchar Nagar Panchayat, Deputy President Alleges

Updated on: 

आंबेगाव : मंचर नगरपंचायतीमध्ये टक्केवारी घेतल्याशिवाय ठेकेदारांची कामांची बिले काढली जात नाहीत, असा गंभीर आरोप नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी बुधवारी (ता. १८) मुख्याधिकारी किरण मार्कंड यांच्यासमोर केला. यावेळी स्थानिक पत्रकार उपस्थित होते.

थोरात म्हणाले, "नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असतानाच्या ठेकेदारांची बिले प्राधान्याने काढली जातात. मात्र, सध्याच्या ठेकेदारांना बिलांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. बिले काढण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी."

Loading content, please wait...