

मंचर, ता. १७ : ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या मंचर एसटी आगाराच्या ताफ्यात आता नव्या बसचे बळ मिळाले आहे. ‘राजमाता जिजाऊ’ नावाच्या पाच नव्या एसटी बस शुक्रवारी (ता. १६) आगारात दाखल झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. आणखी पाच नव्या बस लवकरच मिळणार असल्याने मंचर आगाराच्या बससेवेत आणखी वाढ होणार आहे.
मंचर एसटी आगार सुरू होऊन चार वर्षे झाली. मात्र, सुरुवातीच्या काळात अन्य आगारांतून जुन्या बस उपलब्ध होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बसची कमतरता आणि वाढत्या प्रवासी संख्येमुळे ग्रामीण मार्गांवरील वाहतुकीवरही ताण येत होता. ही बाब लक्षात घेऊन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एसटी महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांतून दीड वर्षापूर्वी आगाराला दहा नव्या लालपरी मिळाल्या होत्या. आता त्यात आणखी पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसची भर पडली आहे. सध्या मंचर आगाराच्या ताफ्यात २९ बस असून, त्याद्वारे तालुक्यातील विविध गावांसह लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवासी वाहतूक केली जाते.
तालुक्याच्या विविध मार्गावर बसच्या फेऱ्या वाढविल्या जातील, अशी माहिती तांबडे मळा/मंचर आगारप्रमुख आरिफ पटेल यांनी दिली.
“मंचर एसटी आगाराला आणखी पाच नव्या बस मिळणार आहेत. ग्रामीण भागातील प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात पाच बस दाखल झाल्या असून, आणखी पाच बस लवकरच उपलब्ध होतील.”
-दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.