मंचरला ४० हजार पिशव्यांची आवक

मंचरला  ४० हजार पिशव्यांची आवक
Published on

मंचर, ता. २० : मंचर (ता. आंबेगाव) कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. २०) कांद्याची सुमारे ४० हजार पिशव्यांची विक्रमी आवक झाली. अवघ्या दोन दिवसांत चांगल्या प्रतीच्या कांद्याचा बाजारभाव १० किलोमागे ४५०-५४० रुपयांवरून ३५०-४०० रुपयांपर्यंत खाली आले.
मोठ्या प्रमाणातील आवकेमुळे बाजार समिती परिसर अक्षरशः कांद्याने फुलून गेला. कांद्याच्या पिशव्या ठेवण्यासाठी जागा अपुरी पडल्याने वाहनतळाच्या जागेतही कांदा साठवावा लागला. वाहनांच्या पार्किंगसाठीही जागा उपलब्ध नसल्याने बाजारातील व्यवस्थेवर ताण निर्माण झाला.
दरम्यान, गुरुवारी आवक झपाट्याने वाढताच बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाल्याने दर घसरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com