Manchar Police : गुन्हे नियंत्रणापासून लोकजागृतीपर्यंत उल्लेखनीय कामगिरी, मंचर पोलिसांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार; नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव

गुन्हे नियंत्रण, गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि लोकाभिमुख उपक्रमांमधील कामगिरीची दखल घेत मंचर पोलीस ठाण्याला कोल्हापूर परिक्षेत्रातील उत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Manchar Police Station Wins Best Police Station Award 2025-26

Manchar Police Station Wins Best Police Station Award 2025-26

esakal

Updated on: 

मंचर : गुन्हे नियंत्रण, गंभीर गुन्ह्यांचा तपास, कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच लोकाभिमुख उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल मंचर पोलीस ठाण्याला सन २०२५-२६ या वर्षातील कोल्हापूर परिक्षेत्रातील उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून गौरविण्यात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयात कार्यक्रम झाला

Loading content, please wait...

Related Stories