
मंचर : गेल्या ७५ वर्षापासून फिलिस्तीन मधील मुस्लिम धर्माचे सर्वोच्च मज्जिदे-अक्सा या धर्मस्थळावर इस्रायलने अनधीकृतपणे ताबा घेतलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मंचर (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.२८) दुपारी मुस्लीम बांधवांनी निषेध मोर्चा काढून इस्रायल देशाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भारताचा तिरंगा झेंडा हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा उस्फूर्तपणे देण्यात आल्या.