

Manchar Locals Help Nagpur Pilgrims After Bus Accident
Sakal
मंचर : एकूण तीन बसेसमधून तब्बल १५० भाविक प्रवास करत होते. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. अपघातानंतर त्यांच्यासमोर निवास व भोजनाची मोठी अडचण निर्माण झाली होती. या प्रसंगी अभियंता संघटनेच्या माध्यमातून मंचर परिसरातील काही मान्यवर नागरिक तत्काळ मदतीला धावून आले. त्यांनी सर्व भाविकांसाठी विनामूल्य भोजन व मुक्कामाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले. नागपूर जिल्हा अभियंता संघटनेचे सचिव गणेश शहारे, राज्याध्यक्ष सुहास धारासुरकर यांनी राज्य उपाध्यक्ष व पुणे जिल्हा शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर उभे (रा.लांडेवाडी, ता.आंबेगाव) यांच्याशी संपर्क करून भाविकांवर उद्भवलेल्या प्रसंगाची माहिती दिली.