Rural Heart Attack Care : मंचर उपजिल्हा रुग्णालयातील तातडीच्या ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचाराने शेतकऱ्याचे प्राण वाचले

वेळेत मिळालेल्या थ्रॉम्बोलिसिस उपचारामुळे शेतकऱ्याचे प्राण वाचले; ग्रामीण भागातही हृदयविकारावर तातडीची आधुनिक सुविधा
Timely thrombolysis saves farmer’s life after severe heart attack.

Timely thrombolysis saves farmer’s life after severe heart attack.

Sakal

Updated on

मंचर : शेतात काम करत असताना अचानक छातीत तीव्र वेदना, घाम आणि चक्कर येऊ लागल्याने शेवाळवाडी (ता. आंबेगाव) येथील घाबरलेले सुधाकर दत्तात्रय थोरात (वय ४५) या शेतकऱ्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. तपासणीत तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी वेळ न दवडता ‘थ्रॉम्बोलिसिस’ उपचार सुरू केले. सुमारे एक तासाच्या तातडीच्या उपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. त्यामुळे वेळेत मिळालेल्या वैद्यकीय उपचारामुळे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यातही रुग्णाचा जीव वाचू शकतो, हे पुन्हा अधोरेखित झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com