एकलहरे परिसरात 
तीन तरसांचा वावर

एकलहरे परिसरात तीन तरसांचा वावर

Published on

मंचर, ता. १६ : बिबट्या पाठोपाठ आता तरसांचा वावर व उपद्रव वाढल्याने मंचर व एकलहरे (ता. आंबेगाव) येथील नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी (ता. १५) रात्री मंचर शहरात भरवस्तीत असलेल्या शिवगिरी मंगल कार्यालयासमोर व जुन्या पुणे- नाशिक महामार्गालगत घोड नदीच्या पुलावर एकलहरे गावाच्या हद्दीत एकूण तीन तरस नागरिकांना दिसले. डॉ. बाळकृष्ण थोरात, त्यांची पत्नी सुरेखा थोरात, मुलगी अन्वी थोरात व मनस्वी थोरात हे मोटारीने गुरुवारी रात्री मंचरहून एकलहरे मार्गे कळंब गावाकडे जात होते. त्यांना शिवगिरी मंगल कार्यालय येथे तरस गाडीसमोरून पळत जाताना दिसला. यावेळी अन्वी थोरात हिने तरसाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यावेळी त्यांना दुसराही तरस दिसला. दरम्यान, एकलहरे येथे पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता. १६) सकाळी झालेल्या अपघातात तरसाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. हा तरस नर जातीचा असून त्याचे वय पाच आहे. वनपाल सोनल भालेराव व वनरक्षक संपत तांदळे यांनी पंचनामा केला आहे.कळंब येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. निचीकेत कठाळे यांनी शवविच्छेदन केले.

15024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com