

Shepherd Seriously Injured in Mandalevadi Dispute
Sakal
पारगाव : मांदळेवाडी ता. आंबेगाव येथे तलावामध्ये बक-यांना पाणी पाजायचे नाही. तुमची बकरे रस्त्याच्या खाली उतरवायची नाही. असे म्हणुन लाथा बुक्क्याने मारहाण करून दमदाटी करत लहानु बुका कोळपे (वय ६० वर्षे) मूळ रा. शिंदेवाडी (मलठण) ता. शिरूर सध्या रा. मांदळेवाडी या मेंढपाळाच्या कपाळावर मध्यभागी कु-हाड मारून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक अल्पवयीन मुला सह एकूण पाच जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून यापैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.