अज्ञात वाहनाच्या धडकेत इनामगावात दोघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

इनामगाव (ता. शिरुर) येथे एका अज्ञात वाहनाने दोघांना चिरडल्याने तरुणाचा जागीच तर ज्येष्ठ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत इनामगावात दोघांचा मृत्यू

मांडवगण फराटा - इनामगाव (ता. शिरुर) येथे एका अज्ञात वाहनाने दोघांना चिरडल्याने तरुणाचा जागीच तर ज्येष्ठ व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर घटनेची फिर्याद राकेश विष्णु यादव (वय ४० वर्षे), व्यवसाय- मजुरी सध्या रा. इनामगाव, भिमनगर ता.शिरुर जि.पुणे, मुळ रा. बिझीरी फंदवानी ता.जि.मुंगेली (छत्तीसगढ़) यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

मांडवगण फराटा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसी राकेश यादव (वय -१९) व्यवसाय- मजुरी सध्या रा. इनामगाव, भिमनगर ता.शिरुर जि.पुणे, मुळ रा. बिझीरी फंदवानी ता.जि.मुंगेली (छत्तीसगढ़) व किसन भिमाजी आल्हाट रा. भिमनगर, इनामगाव ता. शिरुर जि. पुणे हे दोघे मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास गावातून घरी पायी चालत जात होते. येथील बाबासाहेब मोकाशी यांच्या घराजवळ तांदळी बाजूकडून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना समोरुन जोरदार धडक देत चिरडले. यात गंभीर जखमी झाल्याने तुलसी यादव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

किसन आल्हाट हे गंभीर जखमी झाल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यु पावले आहेत. वाहन चालक अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी वाहनासह फरार झाला आहे. पोलीसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस नाईक संपत खबाले, पोलिस नाईक अमोल गवळी, ठाणे अमलदार योगेश गुंड हे करीत आहेत.

टॅग्स :Vehicleaccidentdeath