सागवानी प्रभावळ मेंडके परिवाराच्या देवीला

सागवानी प्रभावळ मेंडके परिवाराच्या देवीला
Published on: 

PNE26W59953 PNE26W59954

मेंडके देवीला ५० वर्षांपूर्वी साकारली सागवानी प्रभावळ
चंद्राम मामा शिरसी यांची कलाकुसर; श्याम सारंग यांनी घडविलेल्या तीन मूर्तींपैकी एक

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १८ : सागवानी लाकडावरील सुबक कोरीवकाम अन् आकर्षक कलाकुसर ही जुनी फौजदार चावडी परिसरातील मेंडके घराण्याच्या देवीच्या प्रभावळीची वैशिष्ट्ये आहेत. कै. सिद्धरामप्पा मेंडके यांच्या संकल्पनेतून चंद्राम मामा शिरसी यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी ही प्रभावळ साकारली. कोकणातील प्रसिद्ध मूर्तिकार श्याम सारंग यांनी घडविलेल्या सोलापुरातील तीन मूर्तींपैकी ही एक आहे.

देवीची मूर्ती चतुर्भुज अन् सहा फूट उंच असून तिला चांदी-सोन्याचे अलंकार घालण्यात आले आहेत. देवीसमोर सागवानी लाकडाची समईही आहे. सागवानी प्रभावळ असलेल्या या दुर्मीळ मूर्तीची मेंडके परिवाराकडून आजही काळजी घेतली जाते.

७० वर्षांची नवरात्रोत्सवाची परंपरा
कै. रेवणसिद्धप्पा मेंडके अन् त्यांच्या पत्नी कै. सोनुबाई रेवणसिद्धप्पा मेंडके यांनी सुमारे ७० वर्षांपूर्वी देवीची स्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली. त्या काळात शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ अन् दक्षिण कसबा परिसरातील मोजक्या प्रसिद्ध देवींच्या मूर्तींमध्ये मेंडके देवीची ओळख होती. रेवणसिद्धप्पा यांच्यानंतर कै. सिद्धरामप्पा मेंडके यांनी परंपरा पुढे नेली. सध्या शिवानंद मेंडके उत्सवाची जबाबदारी सांभाळत असून, परिवारातील चौथी पिढीही देवीच्या सेवेत कार्यरत आहे, असे समर्थ मेंडके यांनी सांगितले.

श्याम सारंग यांच्या तीन मूर्ती
माणिक चौक व्यापारी मंडळाची देवी, मेकॅनिक चौकातील आजाद हिंद मंडळाची देवी अन् मेंडके घराण्याची देवी अशा तीन मूर्ती श्याम सारंग यांनी सोलापुरात घडविल्या आहेत.
-----------------------------------------
कोट PNE26W59954
- श्री देवीची मूर्ती चतुर्भुज आणि सहा फूट उंच असून अत्यंत कोरीव व सुबक आहे. मूर्तीला चांदी-सोन्याचे अलंकार केले आहेत. सागवानी प्रभावळ असलेली मूर्ती फार दुर्मीळ आहे. दरवर्षी तिला पॉलिश करणे आणि रंग देणे अशी कामे केली जातात.
- शिवानंद काका मेंडके, मुख्य अर्चक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com