ढेबेवाडी मंद्रुळच्या पाटील आवाडात टँकरने पाणीपुरवठा
मंद्रुळच्या पाटीलआवाडात टँकरद्वारे पाणी
कृत्रिम टंचाई; मृणाल पाटील, महेश पाटलांकडून माेफत सेवा
ढेबेवाडी, ता.२६ : नळ पाणीपुरवठा योजनांच्या मोटारीच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्याने निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील यांच्या विनंतीनुसार त्यांचे वडील उद्योजक महेश पाटील यांच्यातर्फे मंद्रुळकोळे येथील पाटीलआवाड परिसरात दोन दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
परिसरात कृषी आणि नळ पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींना जोडलेल्या केबल त्यातील तांब्याच्या तारेच्या आशेने चोरून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दररोज विविध गावांतून दोन- तीन पंपांच्या केबल चोरीस गेल्याच्या घटना समोर येत आहेत. पाण्यातील मोटार ते मोटार घरातील स्टार्टर दरम्यानच्या केबल कापून नेल्याने अनेक ग्रामपंचायतींना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहेच, शिवाय पंप पाण्याबाहेर काढून त्याला नवीन केबल जोडेपर्यंत बराच वेळ जात असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईशी सामनाही करावा लागत आहे. दरम्यान, मंद्रुळकोळे येथील पाटीलआवाड परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तेथील शिवसेनेचे सागर पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार आणि जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील यांनी त्यांचे वडील उद्योजक महेश पाटील यांना सुचविल्याप्रमाणे दहा हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे खर्चासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गंगाराम पाटील यांचेही त्यासाठी साहाय्य लाभले. परिसरातील विविध वस्त्यांवरील नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळाला. मृणाल पाटील व महेश पाटील यांना त्यांनी धन्यवाद दिले.
B08158
पाटीलआवाड (मंद्रुळकोळे) : कृत्रिम पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महेश पाटील कंपनीतर्फे टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरू आहे.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

