मंगळवेढ्यात ताबूत विसर्जनाने मोहरमची उत्साहात सांगता

मंगळवेढ्यात ताबूत विसर्जनाने मोहरमची उत्साहात सांगता
Published on

भाळवणी ता.मंगळवेढा येथे मोहरम सणाची सांगता ताबूत विसर्जनाने झाली.

ताबूत विसर्जनाने मोहरम उत्सवाची सांगता
मंगळवेढा तालुक्यातील ३३ गावांत हिंदू-मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २६ : तालुक्यातील ३३ गावांमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मोहरम उत्सवाची ताबूत विसर्जनाने शांततेत व उत्साहात सांगता झाली. उत्सवादरम्यान हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले.

तालुक्यातील ८० ठिकाणी पंजांची स्थापना करण्यात आली होती. तसेच ३१ ठिकाणी डोले आणि १५ ठिकाणी घोडे बसविण्यात आले होते. दहा दिवसांच्या उत्सवात रिवायत गीते, पौड, लेझीम तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी कत्तलची रात्र हा पारंपरिक कार्यक्रमही पार पडला.
हुलजंती, जित्ती, नंदुर, नंदेश्वर, सलगर (बु.), खडकी, मरवडे, भाळवणी, रड्डे, लोणार, निंबोणी, खोमनाळ, आंधळगाव, सिद्धापूर, अरळी, लवंगी, शिवणगी, तळसंगी, बावची, पडोळकरवाडी, खुपसंगी आदी गावांमध्ये पंजे आणि डोल्यांची स्थापना करण्यात आली होती. मोहरम उत्सवात मुस्लिम बांधवांसह हिंदू समाजानेही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. ताबूत विसर्जनाच्या दिवशी काही गावांमध्ये सरबत वाटप करण्यात आले.

कोट
- मंगळवेढा शहरातील नवरात्र महोत्सवाचा अध्यक्ष मुस्लिम समाजातील असतो, तर गैबीपीर उरूस समितीचा अध्यक्ष हिंदू समाजातील असतो. या परंपरेतून तालुक्यात सर्व धार्मिक सण सलोख्याच्या वातावरणात साजरे केले जातात. मोहरम उत्सवातही त्याच सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.
- लतीफ तांबोळी, मरवडे
--
-सर्व जाती-धर्मांचे सण एकमेकांच्या सहभागातून साजरे झाल्यास सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो. त्यामुळे वादाचे प्रसंग टळतात आणि पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताणही कमी होतो. मंगळवेढ्याचा हा आदर्श इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
- दत्तात्रेय बोरीगिड्डे, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com