Gram Panchayat Election : करंजावणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंगल संतोष दौंडकर प्रचंड मतांनी विजयी

मंगल संतोष दौंडकर यांचा विजय; आरती शांतीदेव शिंदे यांचा पराभव
Mangal Santosh Daundkar won post of Sarpanch of Karanjawane Gram Panchayat pune
Mangal Santosh Daundkar won post of Sarpanch of Karanjawane Gram Panchayat punesakal

तळेगाव ढमढेरे : करंजावणे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगल संतोष दौंडकर यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून,आरती शांतीदेव शिंदे यांचा दारुण पराभव झाला आहे. करंजावणे गावात सरपंचपदासह तीन प्रभागात सदस्यपदासाठी चुरशीने मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.बी. जगताप यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी माजी सरपंच संतोष दौंडकर यांच्या पत्नी मंगल दौंडकर यांछा ७३९ मते मिळून विजय झाला तर माजी सरपंच शांतीदेव शिंदे यांच्या पत्नी आरती शिंदे यांचा ३९५ मते मिळाल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सरपंचपदाच्या निवडणुकीत मंगल संतोष दौंडकर या प्रचंड मताने विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

विजयानंतर नवर्निर्वाचित सरपंच मंगल दौंडकर यांनी रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक महागणपतीचे दर्शन घेतले. तेथे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर करंजावणे गावातून सरपंचासह नूतन सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांतर्फे सरपंच मंगल दौंडकर व सदस्यांचा ठीक ठिकाणी सत्कार करण्यात आला.

प्रभाग व आरक्षणानुसार विजयी सदस्य व मते :-

प्रभाग क्रमांक - १ (सर्वसाधारण) १ जागा :- रंगनाथ शहाजी शिंदे (२९३ मते).

सर्वसाधारण स्त्री राखीव- २ जागा :- सुजाता प्रकाश काळकुटे २०३) व सुभद्रा निळकंठ माकर (२५१).

प्रभाग क्रमांक-२ -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव १ जागा :- स्वाती कैलास कुदळे (२७०).

सर्वसाधारण स्त्री राखीव जागा :- मोहिनी किरण दौंडकर (२६८).

सर्वसाधारण जागा १ :- श्रीराम संपत शेलार ( बिनविरोध).

प्रभाग क्रमांक ३- सर्वसाधारण स्त्री राखीव जागा १:- अनुसया नामदेव इंगळे (२२१).

सर्वसाधारण जागा १ - राजू खंडू पुणेकर ( बिनविरोध).

नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा १: बिरा चंदर कुलाळ (बिनविरोध).

"सरपंचपदी निवड झालेल्या सौ मंगल संतोष दौंडकर या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असून, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतिचे कामकाज पाहणार असल्याचे माजी सरपंच संतोष दौंडकर यांनी यावेळी सांगितले. करंजावणेच्या सरपंच मंगल संतोष दौंडकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असून त्यांचा विजय हा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवीबापू काळे यांनी सांगितले. नवनिर्वाचित सरपंच मंगल दौंडकर यांचे आमदार अशोक पवार यांनी अभिनंदन केले आहे"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com