Marathi Literature : विनोदी कादंबरी लिहिण्याचे आव्हान लेखकांनी स्वीकारावे : मंगला गोडबोले

Marathi Literature : "समाज अतिसंवेदनशील झाला असून मराठी साहित्यात विनोदी लेखनाचा अभाव आहे," असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.
Marathi Literature
Marathi LiteratureSakal
Updated on

पुणे : ‘‘समाज अतिसंवेदनशील झाला असून लोकांनी विनोदाची दारे बंद केली आहेत. तसेच, आधुनिक काळात लेखन करणाऱ्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व राहिलेले नाही. मराठी भाषेत शब्दांवर फारसे खेळले जात नाही. मराठी साहित्यात दहा वर्षात एकही विनोदी कादंबरी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विनोदी साहित्य लिहिणाऱ्या लेखकांनी विनोदी कादंबरी लिहिण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे,’’ असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com