

Accused in the robbery case with the seized jewellery and motorcycles; investigating officers in the background.
Sakal
वडगाव निंबाळकर : कानडवाडी (ता. बारामती) येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या सराईत टोळीचा वडगाव निंबाळकर पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या दागिन्यांसह दोन मोटारसायकली असा सुमारे ११ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जबरी चोरीचे तब्बल दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.