मंगळवेढ्यात एका 23 वर्षीय विवाहितेने अज्ञात कारणावरुन केली आत्महत्या
मंगळवेढ्यात २३ वर्षीय विवाहितेने
अज्ञात कारणावरून केली आत्महत्या
.........
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ४ : शहरातील सप्तशृंगीनगर परिसरात राहणाऱ्या धनश्री संदीप जगताप (वय २३) या विवाहित तरुणीने अज्ञात कारणावरून विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील खबर देणारे संदीप जगताप (रा. सप्तशृंगीनगर ढवळस रोड) मृत तथा खबर देणारे यांची पत्नी धनश्री संदीप जगताप (वय २३) हिने बुधवारी (ता ४) सकाळी ९. ४५ वाजता खबरी देणारे तिचे पती यांनी मृत धनश्री हिस कपडे धुण्यासाठी शेतातील पत्राशेडवर सोडून ते महाईसेवा केंद्रामध्ये आले होते. सकाळी अकराच्या सुमारास खबर देणारे यांची आई हिने फोन करून सांगितले की, मी आपल्या पत्राशेड समोर कपडे धूत होती धनश्री ही पत्राशेडच्या बाजूला आंब्याच्या बागेमध्ये बसलेली होती. थोड्यावेळाने आई रंजना हिने धनश्रीकडे पाहिले असता त्या ठिकाणी दिसून आली नाही. लगेच कुटुंबीयांनी विहिरीजवळ शोध घेतला असता विहिरीमध्ये एक ओढणी दिसल्याने तिच्या पतीने विहिरीत उडी मारुन त्या ठिकाणी शोध घेतला असता पाण्यामध्ये पत्नी धनश्री मिळून आली. जमलेल्या लोकांच्या मदतीने तिला वरती काढले. त्यावेळी ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने तत्काळ तिला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

